नेपाळ भूकंप : मुग्धा गोडसेच्या चित्रपटातील ८ ठार

नेपाळ भूकंपात तेलुगू अभिनेता के. विजयच्या दुखःद निधनानंतर चित्रपट जगताशी निगडीत आणखी एक बातमी समोर आली आहे. मुग्धा गोडसे आणि रुस्लान मुमताज यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Apr 28, 2015, 04:39 PM IST
नेपाळ भूकंप : मुग्धा गोडसेच्या चित्रपटातील ८ ठार  title=

काठमांडू : नेपाळ भूकंपात तेलुगू अभिनेता के. विजयच्या दुखःद निधनानंतर चित्रपट जगताशी निगडीत आणखी एक बातमी समोर आली आहे. मुग्धा गोडसे आणि रुस्लान मुमताज यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

हे सर्व आठ क्रू मेंबर नेपाळमध्ये आपल्या आगामी चित्रपटाची शुटिंग करीत होता. मुग्धा गोडसे आमि रुस्लान मुमताज त्या ठिकाणाहून निघून आले पण इतर आठ जणांचा मृत्यू झाला. 

मुग्धाने ट्विटरवर ट्विट करून ही दुःखद माहिती दिली आहे. माझ्या आगामी चित्रपटातील आठ क्रू मेंबरच्या आत्म्याला शांती मिळो... जे नैसर्गिक प्रकोप भूकंपाचे शिकार झाले आहेत. हे खूप धक्कादायक आणि दुःखद आहे... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.