महिलांनो, सार्वजनिक वाहनांमध्ये मिनी स्कर्ट घालू नका!

जर लैंगिक शोषणाच्या घटना टाळायच्या असतील, तर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या महिलांनी मिनी स्कर्टसारखे हॉट कपडे घालू नयेत, असा सल्ला चीनच्या पोलिसांनी दिला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 5, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
जर लैंगिक शोषणाच्या घटना टाळायच्या असतील, तर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या महिलांनी मिनी स्कर्टसारखे हॉट कपडे घालू नयेत, असा सल्ला चीनच्या पोलिसांनी दिला आहे.या शिवाय महिलांनी सार्वजिनक वाहतुकीदरम्यान बँग किंवा पेपरने आपला चेहरा लपवावा, जेणेकरुन कुणी तुमचा चोरून फोटो काढू शकणार नाही.
चीनमध्येही सार्वजनिक वाहतुकीमध्ये महिलांना छेडछाड तसंच लैंगिक शोषणासारख्या गोष्टींना बळी पडावं लागतं. यासंदर्भात अनेक तक्रारीही पोलिसांकडे येत असतात. चीनमध्ये कित्येक बस, ट्रेनमध्ये कॅमेरे लावलेलेच नसतात. त्यामुले अशा घटनांमधील दोषी व्यक्तींना पकडणं अशक्य होतं. छेडछाड करणाऱ्या दोषींना किमान १५ दिवस जेलमध्ये ठेवण्यात येतं.
चीनमध्ये साम्यवादी सरकार आल्यावर माओ त्से तुंग याने अर्ध जग महिलांपासून बनलं आहे, असं म्हटलं होतं. मात्र तरीही महिलांना पुरेशी सुरक्षा देण्यात चीन अपुरं पडत आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये तसंच खाजगी व्यवसायातही अनेक महिलांना रोज छेडछाड किंवा लैंगिक शोषणाशी सामना करावा लागतो. भारताप्रमाणे चीनमध्येही महिलांना या गोष्टींना बळी पडावं लागत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.