www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
जर का तुम्हाला कुत्रा चावला तर त्या कुत्र्याच्या मालकाकडून तुम्ही किती भरापाई मागाल? न्यू यॉर्कमध्ये तर एका व्यक्तिने कुत्रा चावल्यामुळे 2,000,000,000,000,000, 000,000,000,000,000,000 डॉलर भरपाई कोर्टाकडून कुत्र्याच्या मालकाकडे मागितला आहे. आता पर्यंत मागितल्या गेलेल्या भरपाईच्या खर्चातली ही रक्कम सगळ्यात जास्त आहे. त्याने २ वर २६ शून्य असलेलली भरपाई मागितली आहे.
६२ वर्षाच्या एंटन प्यूरिसिमाने मॅनहॅटन फेडरल कोर्टात ११ एप्रिल रोजी केस दाखल केली आहे. २२ पानांच्या या तक्रार पत्रात प्यूरिसिमा यांनी दावा केला आहे की, एका सिटी बसमध्ये त्यांच्या मधल्या बोटावर एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावलं. यावेळी एका चीनी जोडप्याने त्या परिस्थितीचे काही फोटो काढले आहेत.
प्यूरिसिमाने लिहलंय की, `या घटनेमुळे मला, जी काही दुखापत आणि नुकसान झालेलं आहे, याची भरपाई पैसा देऊन करता येणार नाही.` पुराव्यासाठी एंटन यांनी आपले रक्ताने जखम झालेलं बोटाचा फोटो कोर्टात दाखवला आहे. प्यूरिसिमा यांनी दावा केला आहे की, या घटने दरम्यान नागरी अधिकारांच उल्लंघन आणि त्यांच्या बाबतीत भेदभाव करण्यात आला.
या शिवाय प्यूरिसिमा यांनी त्यांच्यावर हिंसा, दुखापत, धोका देणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे आणि मुद्दाम भावनात्मक दु:ख देणे हे आरोप देखील केले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.