डॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री!

डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय. 

Updated: Feb 5, 2015, 11:37 AM IST
डॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री! title=

नवी दिल्ली: डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय. 

जपानमध्ये नुकतीच एक घटना समोर आलीय, ज्यात डॉक्टरनं मेडिकल स्टडीच्या नावानं पहिले तर महिलांना ड्रग्ज दिलं आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा अश्लिल व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्यानं पॉर्न साइटवर विकला. एक-दोन नाही तर तब्बल 100 महिलांसोबत त्यानं हे घाणेरडं कृत्य केलं. 

नुकताच जपानमध्ये एका खोट्या डॉक्टरला अटक करण्यात आलीय. ज्याच्यावर स्लीप स्टडीच्या नावाखाली 100 महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. 

जपानच्या चिबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय आरोपी हिदेयुकी नोगुचीनं पहिले तर स्वत:ला डॉक्टर म्हणून प्रसिद्ध केलं आणि नंतर जपानच्या महिलांना एका मेडिकल स्टडीचा भाग बनवून जाहिरात प्रसिद्ध केली. 

डेली मेलमधील बातमीनुसार, आरोपीची जाहिरात पाहून अनेक महिला या मेडिकल स्टडीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचल्या. तिथं महिलांना फसवून त्यांना ड्रग्ज देऊन बेशुद्ध केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला. 

आरोपी महिलांना हॉटेल्स आणि महागड्या रिसॉर्टमध्ये बोलवत होता. पीडितांच्या यादीत अल्पवयीन मुलीपासून 40 वर्षाच्या महिलांपर्यंतच्या सर्वांचा समावेश आहे. 

एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर त्यानं महिलांवरील बलात्कारचा व्हिडिओ बनवला आणि हा अश्लिल व्हिडिओ इंटरनेटवर टाकणं सुरू केलं. एवढंच नव्हे तर त्यानं हे अश्लिल व्हिडिओ पॉर्न वेबसाइटच्या प्रोड्युसरलाही विकला आणि त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची कमाई केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.