दगाबाज बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडला ढकलले वेश्याव्यवसायात

गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मोठा धोका दिला. एका तरुणाने आपल्याच गर्लफ्रेंडवर सामूहिक अत्याचार घडवून आणला. यामध्ये तिच्यासह ११० जण सहभागी झाली होते.

Reuters | Updated: Jan 23, 2016, 03:30 PM IST
दगाबाज बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडला ढकलले वेश्याव्यवसायात title=

लंडन : गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मोठा धोका दिला. एका तरुणाने आपल्याच गर्लफ्रेंडवर सामूहिक अत्याचार घडवून आणला. यामध्ये तिच्यासह ११० जण सहभागी झाली होते.

या बॉयफ्रेंडने तब्बल ११० जणांसोबत धमकी देऊन शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले आहे. ही बाब तब्बल सात वर्षांच्या अत्याचारानंतर पुढे आलेय. ही तरुणी इंग्लंडची नागरिक असून सात वर्षांपूर्वी सुटीसाठी ग्रीस गेली होती.  तिची ओळख जॅक नावाच्या एका मुलाशी झाली.

मैत्री ठरली धोकादायक

ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. नंतर मैत्रीतून प्रेम असा प्रवास झाल्यानंतर जॅकने पीडित तरुणीला लग्नाचे वचन दिले. जॅकने तिला ग्रीसची राजधानी अथेन्सला घेऊन गेला. तिथेच तिला धोका देण्यात आला.

जॅक तिला एका इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर घेऊन केला. तेथे तिला एका खोलीत ठेवण्यात आले. खिडकी नसलेल्या त्या खोलीत एक कॅमेरा आणि बेड होता. काही कळण्याच्या आतच एका व्यक्तीने खोलीत प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

 

धक्कादायक म्हणजे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीने जाताना दिला ५० यूरो दिले. या घटनेनंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित तरुणीला नंतर लक्षात आले, आपल्याल वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले आहे.

व्यस्था पुस्तकात  

काही वेळा एका दिवसात आठ ते दहा जण जबरदस्तीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत. काही दिवसांनी मेगानला पुन्हा दुसरीकडे विकण्यात आले. या ठिकाणी एका दिवसात ११० जणांनी संबंध ठेवले. त्यानंतर ती आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल केले. ती तब्बल ३ महिने रुग्णालयात होती. त्यावेळी तिची करुण कहाणी रुग्णालायती व्यक्तींना समजली. त्यानंतर तिच्या ईला माहिती देण्यात आली. आती ती इंग्लंडमध्ये स्वतःच्या घरी आलेय. ती आपली व्यस्था पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणणार आहे. हार्पर प्रकाशनद्वारे हे पुस्तक २९ जानेवारी रोजी वाचकांना उपलब्ध होईल.