www.24taas.com, पॅरिस
जागतिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्यातील २०१२ या वर्षाचा नोबेल पुरस्कार चीनचे लेखक मो यान यांना जाहीर झाला आहे. स्वीडीश अकादमीने आज स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा केली. विज्ञान, साहित्य आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो.
गेल्यावर्षी हा पुरस्कार स्विडीश कवी टॉमस ट्रान्सटॉमर यांना देण्यात आला होता. नोबेलचा पहिला पुरस्कार १९०१मध्ये देण्यात आला होता.
८० लाख स्वीडीश क्रॉनोर म्हणजे सुमारे १२ लाख डॉलर असे पुरस्काराचे स्वरूप असते.
मो यांचा जन्म चीनमधील गाओमी या ठिकाणी १९५५मध्ये झाला. चीनमधील लोक कथा, इतिहास आणि समकालीन लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जपानचे लेखक हारुकी मुराकामी या पुरस्काराच्या स्पर्धेत होते मात्र स्वीडीश समितीने मो यांची एकमताने निवड केली.