www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेक उपचार केले जातात. मात्र, चीनमध्ये यासाठी अत्यंत घृणास्पद आणि अघोरी उपाय सुरू झाले आहेत. या उपयांना मिळणारा प्रतिसादही वाढतो आहे. चीनमध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी चक्क ‘बेबी सूप’ पिण्याचं प्रमाण वाढत आहे.
चीनमध्ये जन्माला येण्यापूर्वी मृत पावलेलं भ्रूण आता दोन हजार युआन (२० हजार रुपये) किमतीला मिळतंय. पाडण्यात आलेलं भ्रूण काही शे युआनमध्ये विकलं जाऊ लागलंय़. या भ्रुणाचं सूप बनवून खाल्ल्यास लैंगिक क्षमता वाढते, असा समज आहे. चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे ‘एक मुलगा पॉलिसी’ सरकारने सुरू केली आहे. परिणामी, पाडण्यात येणाऱ्या भ्रुणांची संख्या वाढते आहे. दुर्दैवाने अशी भ्रूण बेबी सूपच्या रूपात चीनी लोक खात आहेत. या प्रकाराला सरकारी पातळीवरही कुठला कायदा विरोध करत नसल्याने नरभक्षणालाच एक प्रकारे संमती मिळत असल्याचं दिसू लागलंय.
‘बेबी सूप’संदर्भातील फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर दिसू लागल्यावर लोकांनी कडक शब्दांत या खाद्याची निंदा केली आहे.चीनच्या दक्षिण प्रांतात बेबी सूप प्ययलं जातं. हे सूप प्यायल्याने लैंगिक शक्ती अनेक पटींनी वाढते, असं मानलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.