चिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद

लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे.

Updated: Jul 2, 2016, 05:22 PM IST
चिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद  title=

मुंबई : लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे. पाकिस्तानी पत्रकार मन्सूर अली खान यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. 

पाकिस्तानी न्यूज चॅनल दुन्याचा पत्रकार पावसामध्ये एका लहान मुलाला तु पावसात काय करतोयस असा प्रश्न विचारला. तेव्हा काका तुम्ही मला इकडे जबरदस्तीनं घेऊन आलात असं उत्तर या चिमुरड्यानं दिलं. या मुलाच्या उत्तरामुळे पत्रकार मात्र क्लिन बोल्ड झाला. पाहा या मुलाच्या उत्तरावर तो पत्रकार काय म्हणाला ते.