'भावांशी भांडणाऱ्य़ा बहिणीला नोबेल पारितोषिक'

पाकिस्तानच्या खोऱ्यात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलाला युसूफजईवर जेव्हा तालिबान्यांनी हल्ला केला, तेव्हा मलाला युसूफजई जगभरात चर्चेत आली. 

Updated: Dec 10, 2014, 08:53 PM IST
'भावांशी भांडणाऱ्य़ा बहिणीला नोबेल पारितोषिक' title=

ओस्लो : पाकिस्तानच्या खोऱ्यात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलाला युसूफजईवर जेव्हा तालिबान्यांनी हल्ला केला, तेव्हा मलाला युसूफजई जगभरात चर्चेत आली. गंभीर जखमी झालेल्या मलालावर इंग्लंडमध्ये उपचार करण्यात आले, ही घटना 2012 च्या ऑक्टोबर महिन्यात घडली होती.

मलालाला शांतीचं नोबेलं प्रदान करण्यात आलं, त्यानंतर मलाला म्हणाली, "मी पाकिस्तानची सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे, याचा मला गर्व आहे, आणि मी अशी एकमेव नोबेल पुरस्कार विजेती आहे की आजही मी आपल्या लहान भावांशी भांडत असते".

नोबेल पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.

"भारत आणि पाकिस्तान मिळून काम करू शकतात आणि हे बाल अधिकार विषयी सुरू असलेल्य़ा कामांवरून सिद्ध होतंय', असं मलालाने म्हटलंय

सध्याची जी सरकारं आहेत त्यांना बंदूक आणि टँक विकत घेणं सोप झालंय, पण मग मुलांच्या हातात पुस्तक देणं का कठीण झालंय़, असा सवाल मलाला ने उपस्थित केला.
मलाला युसूफजई आणि कैलाश सत्यार्थी यांनी संयुक्तपणे नोबेल पुरस्काराचे चौदा लाख डॉलर मिळाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.