सिरियात आत्मघातकी कार बॉम्बस्फोट

दमिस्कसमध्ये एका सैनिकी विमानतळाजवळील सैन्य चौकीवर झालेल्या कार बॉम्बस्फोटात काही जवान मृत्युमुखी पडलेत तर २० जवान जखमी झाल्याची माहिती ‘मानवी हक्क आयोगाच्या’ सिरियन निरीक्षकांनी दिलीय.

Updated: Jun 17, 2013, 11:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बेरूत
दमिस्कसमध्ये एका सैनिकी विमानतळाजवळील सैन्य चौकीवर झालेल्या कार बॉम्बस्फोटात काही जवान मृत्युमुखी पडलेत तर २० जवान जखमी झाल्याची माहिती ‘मानवी हक्क आयोगाच्या’ सिरियन निरीक्षकांनी दिलीय.
‘मानवी हक्क’ आयोगाच्या सिरियन निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, यास्फोटाबाबत संपूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. या संघटनेकडे आलेल्या माहितीनुसार, २० जवान जखमी झाल्याचे समजते आहे.ब्रिटनमधील निरीक्षकांच असं म्हणणं आहे की, या दमिस्कसमधाल बॉम्बस्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, राजधानीतील अनेक शहरांमध्येही ऐकायला आला. याचवेळी आगीच्या धुराचे लोटही दूरदूरपर्यंत पाहायला मिळालेत.
या स्फोटाआधी मंगळवारीही राजधानीत दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये एक स्फोट पोलीस स्टेशनमध्ये घडवण्यात आला होता. यात १४ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

दमिस्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून असे हल्ले होत आहेत. ज्यात सरकारी इमारती, जवान आणि सुरक्षारक्षक ठिकाणांना लक्ष्य बनवण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.