बुलेटप्रुफ खवले मांजर, मारलेली गोळी परतली, एक जण जखमी

टेक्सासमध्ये एक विचित्र घटना घडली, खवल्या मांजराला बंदुकीतून मारलेली गोळी त्याच्या कवचाला आदळून पुन्हा गोळी मारणाऱ्याच्या चेहऱ्याला लागली. या घटनेत व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. 

Updated: Aug 3, 2015, 07:50 PM IST
बुलेटप्रुफ खवले मांजर, मारलेली गोळी परतली, एक जण जखमी title=
Texas man injured as bullet ricochets off armadillo

टेक्सास : एका प्राण्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातील एक गोळी ती झाडणाऱ्यावर येऊन आदळते.... तो जखमी होतो. हा कोणत्याही रजनीकांत किंवा दाक्षिणात्य चित्रपटातील सीन नाही तर ही घटना खरीखुरी घडली आहे.... 

टेक्सासमध्ये एक विचित्र घटना घडली, खवल्या मांजराला बंदुकीतून मारलेली गोळी त्याच्या कवचाला आदळून पुन्हा गोळी मारणाऱ्याच्या चेहऱ्याला लागली. या घटनेत व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. 

एका अज्ञात व्यक्तीला आपल्या मालमत्तेत खवल्या मांजर दिसते. त्याला ठार मारण्यासाठी त्याने बंदुक काढली. आपल्या बंदुकीतील तीन गोळ्या या खवल्या मांजरावर झाडल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. 

तीन पैकी एक गोळी या खवल्या मांजराच्या खवल्यांना आदळून उसळली आणि गोळी झाडणाऱ्या माणसाच्या जबड्यावर आदळली. या घटनेत मात्र खवल्यांच्या मांजरीला काहीच झाले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.