बोस्टन बॉम्बस्फोट : एक संशयित ठार, दुसरा अटकेत

बोस्टन बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकेन पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. बॉम्बस्फोटा दरम्यान संशयित म्हणून नजरेत आलेल्य दोन तरुणांपैकी हा एक तरुण हे. तर दुसऱ्याचा संशयित तरुणाचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 20, 2013, 04:36 PM IST

www.24taas.com, बोस्टन
बोस्टन बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकेन पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. बॉम्बस्फोटादरम्यान संशयित म्हणून नजरेत आलेल्य दोन तरुणांपैकी हा एक तरुण हे. तर दुसऱ्याचा संशयित तरुणाचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय.
वॉटरटाऊन शहरामध्ये मॅन्सॅच्युसेट तंत्र संस्थेच्या संकुलात घडलेल्या पोलिसांची संशयित तरुणांसोबत चकमक झाली. या भीषण थरारनाट्यात तामेरलॅन सारनेव्ह हा संशयीत ठार झाला तर त्याचा लहान भाऊ झोखार पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, नंतर एका बोटीवरुन गंभीर जखमी अवस्थेत त्याला पोलिसांनी अटक केलीये. दोघेही संशयित सख्खे भाऊ आहेत. रशियाजवळील चेचेन भागातील ते मूळचे रहिवासी आहेत. दोघेही भाऊ २००२ मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरीत झाले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तामेरलॅनला अटक केली त्यावेळी तो गंभीर झालेला होता. त्याच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे त्याला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

बोस्टन मॅरेथॉन दरम्यान प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या दोन बॉम्बच्या साहाय्यानं स्फोट घडवून आणले गेले होते. या घटनेत तीन व्यक्तींचा बळी गेला तर १८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संशयिताबद्दल त्यांना सूचना क्षेत्राच्या एका स्थानिकाकडून माहिती मिळाली. बोटीजवळ रक्ताचे डाग दिसल्यानं त्यानं याबद्दल पोलिसांना सूचना केली होती. लक्ष देऊन पाहिलं असता त्याला एक व्यक्ती रक्तानं माखलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांना तामेरलॅन सारनेव्हला ठार केलं तेव्हा जखमी झालेला झोखार पळून जाण्यात यशस्वी झाल होता. तो या बोटीत येऊन लपून बसला होता.