वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे ई-मेल रशियातील हॅकर्स हॅक करुन वाचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमधील सायबर सुरक्षा व्यवस्था भेदून बराक ओबामा यांचे ई-मेल वाचल्याचे धक्कादायक वृत्त अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने या वृत्तपत्राने दिले आहे.
ओबामा यांचे ई-मेल अकाऊंट हॅक झाल्याचा पुरावा नाही. मात्र, रशियन हॅकर्सनी प्रवेश मिळविलेल्या माहितीच्या साठ्यामध्ये ओबामा यांच्या मेल्सचाही समावेश होता, असे यासंदर्भात टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये अमेरिकेमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा दाखला देत म्हटले आहे.
या वृत्तावर व्हाईट हाऊने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु व्हाईट हाऊसमध्ये हॅकिंग झाल्याच्या वृत्तास गेल्या महिन्यामध्ये प्रशासनाकडून दुजोरा मिळाला होता.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीपेक्षा हे हॅकिंग कितीतरी अधिक धोकादायक होते, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केलाय. ओबामा यांचे नेमके किती ईमेल्स हॅकर्सनी वाचले, याची नेमकी माहिती देण्यात आलेली नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.