राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दोन दिवसीय ऐतिहासिक दौ-यासाठी हवानामध्ये दाखल झालेत. गेल्या 88 वर्षांत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच क्यूबा दौरा आहे.

Updated: Mar 20, 2016, 11:44 PM IST
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दौऱ्यावर title=

हवाना : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दोन दिवसीय ऐतिहासिक दौ-यासाठी हवानामध्ये दाखल झालेत. गेल्या 88 वर्षांत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच क्यूबा दौरा आहे.

ओबामा यांच्या स्वागतासाठी जुन्या हवानामध्ये क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष रऊल कास्त्रो आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मोठमोठाले होर्डि्ग्स लावण्यात आले होते.. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षारक्षकांनी संपूर्ण शहर आपल्या ताब्यात घेतलं होतं. 

1959 साली क्यूबा क्रांतीनंतर दोन्ही देशातील संबंध संपुष्टात आले होते.. यानंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.. अखेर 2014 मध्ये जुने वाद मिटवून नव्यानं संबंध प्रस्थापित करण्यासाठी ओबामा आणि रऊला कास्त्रो यांच्यात सहमती झाली.. ओबामांच्या या दौ-यात कोणतेही महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता नसली तरी 5 दशकांचं शत्रुत्व संपवण्याच्या दृष्टीनं हा दौरा निर्णायक ठरणार आहे.