...आणि ओबामा रडू लागले

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान रडू आलं. ओबामा भाषणात अमेरिकेतील गन कल्चरविरोधात बोलत होते. 

Updated: Jan 6, 2016, 08:26 AM IST
 ...आणि ओबामा रडू लागले title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान रडू आलं. ओबामा भाषणात अमेरिकेतील गन कल्चरविरोधात बोलत होते. 

ओबामा यांनी भावूक होत देशातील गन कल्चर आता संपवलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. तर या गन कल्चरमुळे शाळा-कॉलेजातल्या विद्यार्थ्यांचा नाहक बळी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

तसेच गन लॉबीमुळे ओबामा काँग्रेसमध्ये गन कल्चरवर लगाम कसण्यासाठी कायदा पास करू शकले नाहीत.