अॅप... आपल्या मृत्यूची तारीख सांगणारं अॅप बाजारात!

आपल्याला माहितीय की आपली आयुष्याचे दिवस कधी भरणार आहेत. आता एक अॅप आलंय ज्याचं नाव ‘डेडलाइन’ आहे. हे अॅप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट टूलचं विश्लेषण करून हे सांगू शकेल की, तुम्ही किती दिवस जगणार... 

Updated: Nov 4, 2014, 11:21 AM IST
अॅप... आपल्या मृत्यूची तारीख सांगणारं अॅप बाजारात! title=

न्यू यॉर्क: आपल्याला माहितीय की आपली आयुष्याचे दिवस कधी भरणार आहेत. आता एक अॅप आलंय ज्याचं नाव ‘डेडलाइन’ आहे. हे अॅप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट टूलचं विश्लेषण करून हे सांगू शकेल की, तुम्ही किती दिवस जगणार... 

आयफोनचं हेल्थकिट टूल आपली उंची, डायस्टोलिक ब्लड प्रेशर, आपली झोप आणि पूर्ण दिवसाची तुमचं शारीरिक कार्याचा रेकॉर्ड ठेवला जातो. बस्टलनुसार, डेडलाइन अॅप याच रेकॉर्डचा डेटा वापरून आणि आपल्या जीवनशैलीसंबंधित काही प्रश्नांच्या आधारे आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ ठरवतं. 

अॅपचा निर्मात गिस्ट एसएससीनं अॅपल आयट्युन पेजवर लिहिलं की, कोणतंही अॅप आपल्या मृत्यूची तारीख आणि वेळ अगदी तंतोतंत देऊ शकत नाही. मात्र हे अॅप तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यावर लक्ष ठेवचं आणि आपल्या उत्तर आणि हेल्दी जीवनासाठी प्रेरित करतं. शिवाय गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा, असा सल्लाही वेळोवेळी देतं. 

गिस्ट म्हणतात, आपल्या दैनंदिन जीवनात आहार, जेवण आणि नियमित व्यायामाच्या माध्यमातून आपला दिवस आणि वेळ पुढं जावू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.