www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...
‘एनएसए’ या अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने याहू आणि गुगलची सेंटर्स हॅक करून लक्षावधी खातेधारकांचा डेटा गोळा केलाय. खळबळजनक बाब म्हणजे अमेरिकन यंत्रणेने सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांचेही गुगल अकाऊंटही हॅक केलंय. मस्क्युलर प्रोग्रामच्या नावाखाली अमेरिकेने हे हॅकिंग चालवलं आहे. त्यासाठी ब्रिटनमधील जीसीएचक्यू या सुरक्षा यंत्रणेचीही मदत घेतली जातेय.
अमेरिकेचा हा प्रताप उघडकीस आल्यानंतर गुगल कंपनीने तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.