भारतीय अब्जाधीशांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर

देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.

Updated: Mar 3, 2014, 12:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.

यादीत समावेश असलेल्या ७० भारतीय नावांपैकी पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी विराजमान झालेत. त्यामुळे, मुकेश अंबानी तब्बल १८ अब्ज डॉलरसहीत देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
चीनची जागतिक संशोधन कंपनी `हुरुन`नं दिलेल्या अहवालानुसार, जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी मुकेश अंबानी ४१ व्या स्थानावर आहेत.
या यादीत पहिला नंबर मिळवलाय तो बिल गेट्स यांनी... बिल गेटस् यांच्याकडे ६८ अब्ज डॉलर संपत्ती असल्याचं या अहवालात म्हटलं गेलंय.
या अहवालानूसार, बिल गेट्स यांच्यानंतर टबर्कशायर हैथवे`चे बफे यांचा ६४ अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसरा क्रमांक लागतो.

तिसऱ्या स्थानांवर ६२ अब्ज डॉलर्स संपत्तीसहीत `इंडिटेक्स`चे आमनसियो आहेत. तर ६० अब्ज डॉलर्स संपत्तीसहीत कार्लोस स्लिम हेलू आणि ओरॅकलचे लैरी एलिसन यांचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो.
या अहवालात काही महत्त्वाच्या भारतीयांचाही समावेश आहे. त्यापैंकी लक्ष्मी मित्तल यांच्याकडे १७ अब्ज डॉलर्स व्यक्तीगत संपत्ती असून, ते ४९ व्या स्थानावर आहेत.
विप्रोचे अजीम प्रेमजी आणि सन फार्माचे दिलीप सांघवी यांच्याकडे अनुक्रमे १३.०५ - १३.०५ अब्ज संपत्ती आहे. या अहवालात त्यांचे ७७ वे स्थान आहे.
टाटा सन्सचे पलोंजी मिस्त्री आणि एसपी हिंदूजाचे कुटुंब ९३ व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती अनुक्रमे १२ - १२ अब्ज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.