जाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक

नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...

Updated: Apr 9, 2015, 04:46 PM IST
जाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक title=

सिडनी: नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...

सिडनीमध्ये राहणारे नाथन डेलो यांनी यू-ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यात नाथन मुलाला झोपवण्यासाठी काय प्रयोग करतो, हे दिसतं. यादरम्यान बाळ अवघ्या ४२ सेकंदांमध्ये झोपतांना दिसतोय.

या व्हिडिओनं यू-ट्यूबवर आतापर्यंत तब्बल २६,००० हिट्स मिळवल्यायेत. व्हिडिओमध्ये नाथन डेलो बाळाच्या चेहऱ्यावर पांढरा टिशू पेपरनं हवा देतोय, जोपर्यंत बाळ झोपत नाही.

नाथननं अपलोड केलेल्या या व्हिडिओसोबत लिहिलंय,'मला आशा आहे की, प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला झोपवण्यासाठी ही ट्रिक वापरत असेल.'

नाथन पुढे लिहितो, 'पाहा माझी पत्नी आणि मी आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला सेठला केवळ टिशू पेपरचा वापर करून एका मिनिटाच्या आत झोपवलंय.'

पाहा हा व्हिडिओ -

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.