गरिसा : केनियाच्या एका विद्यापीठ परिसरात गुरुवारी शबाब इस्लामी संघटनेने दहशदवादी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात 147 विद्यार्थ्यांचा दूर्दैवी अंत झाला.
चार शस्त्रधारी दहशतवादी चेहरे झाकून ग्रेनेड फेकत आणि स्वयंचलित रायफलीतून गोळ्या झाडत गरिसा शहरात असलेल्या विश्वविद्यालयात घुसले. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी विद्यार्थी झोपलेले होते. दहशतवाद्यांनी गोळीबार करत अनेकांना ठार केले.
प्रथम त्यांनी मुस्लीम विद्यार्थांना सोडून दिले. मात्र ख्रिश्चन आणि अन्य धर्माच्या विद्यार्थांना त्यांनी बंधक बनवले. केनियाच्या सैनिकांना त्या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
केनियातील विद्यापीठावर झालेला हा दूर्दैवी हल्ला 1998ला अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
या दुर्दैवी हल्ल्यात 147 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 79 लोक जखमी झाले आहेत. केनियावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेद व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.