अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

अफगाणिस्तानातील हेरात या शहरात भारतीय दूतावासावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी आज सकाळी हल्ला केला. गेल्या काही तासांपासून गोळीबार सुरू असून सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेरले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2014, 10:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, काबूल
अफगाणिस्तानातील हेरात या शहरात भारतीय दूतावासावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी आज सकाळी हल्ला केला. गेल्या काही तासांपासून गोळीबार सुरू असून सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेरले आहे.
या संदर्भात माहिती देताना अफगाणिस्तान पोलिसांचे प्रवक्ते म्हणाले, आज सकाळी भारतीय दूतावासावर आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला आहे.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक तासांपासून गोळीबार सुरू आहे.

भारतीय दूतावासावर हल्ला झाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दी यांनी मान्य केले आहे. भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी सुरक्षित असून ऑपरेशन सुरू आहे.
या प्रकरणी कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.