हिटलर मानसिक रोगी आणि षंढ होता, सिक्रेट फाईल उघड

तानाशाहीच्या जोरावर जगाला हादरा देणाऱ्या जर्मनीचा तानाशाह हिटलर याच्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात. हिटलरची मानसिक स्थिती सामान्य नव्हती तर तो मानसिक रोगी होता शिवाय त्याची सेक्स लाईफही सामान्य नव्हती. 

Updated: Mar 30, 2016, 04:34 PM IST
हिटलर मानसिक रोगी आणि षंढ होता, सिक्रेट फाईल उघड title=

न्यूयॉर्क : तानाशाहीच्या जोरावर जगाला हादरा देणाऱ्या जर्मनीचा तानाशाह हिटलर याच्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात. हिटलरची मानसिक स्थिती सामान्य नव्हती तर तो मानसिक रोगी होता शिवाय त्याची सेक्स लाईफही सामान्य नव्हती. 

एक टॉप सिक्रिट मिलिटरी फाईल समोर आल्यानं या गोष्टी समोर आल्यात. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी हिटलरच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवणाऱ्या अमेरिकेच्या गुप्त अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हिटलर हा मानसिक रोगी होता. तसंच त्याचे आपल्याच भाचीसोबत अनैतिक संबंध होते.

'हिटलर षंढ होता'

डॉ. लँगर यांच्या म्हणण्यानुसार, हिटलरचं सेक्स लाईफ सामान्य नव्हतं. तो षंढ असल्याचं यात म्हटलं गेलंय. तो कुणाहीसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी सपशेल फेल ठरत होता. ज्या महिलांना लैंगिक संबंधांबद्दल जास्त माहिती नसेल अशा मुली त्याला पसंत होत्या. या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, हिटलरनं एक संपूर्ण रात्र जर्मन फिल्म स्टार रेनेट मुलरसोबत घालवली होती. परंतु, तो तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करण्यात अपयशी ठरला... काही दिवसांनी मुलर हिने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.

पुस्तकाद्वारे गोष्टी आल्या समोर... 

डेली स्टारनं दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिका हिटलरच्या कमजोर बाजू जाणण्याचा प्रयत्न करत होती... तेव्हा या गोष्टी समोर आल्या. यावर डॉ. वॉल्टर सी लँगर यांनी एक रिपोर्टदेखील तयार केला होता. हाच रिपोर्ट नंतर एका पुस्तकाच्या रुपात प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचं नामकरण करण्यात आलं 'अ सायकोलॉजिकल अॅनलिसिस ऑफ अॅडॉल्फ हिटलर : हिज लाईफ अॅज लिजंड'...