पीजा : इटली या देशातील २७ वर्षीय थिएटर अॅक्टर रफेयल शूमाकर नाटकात फाशीचं एक दृश्य दाखवत असतांना खरोखर त्याला फाशी लागली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नाटक दरम्यान अनेकांना तर कळालंच नाही की त्याला खरोखर फाशी लागली आहे. पण काही जणांना ते लक्षात आलं. त्यानंतर एक महिला धावत गेली आणि तिने ती रस्सी सोडली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
मुळ नाटकमध्ये गोळी लागून मृत्यू झाल्याचं दाखवण्यात येणार होतं पण ऐन वेळी स्क्रिप्ट मध्ये बदल करत फाशीचा सीन दाखवला गेला. त्यामुळे संशय निर्माण झाला.