ओबामांनी केला १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी १०६ वर्षांच्या व्हर्जिनीया मॅकलॉरिन यांच्यासोबत केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. 

Updated: Feb 22, 2016, 02:55 PM IST
ओबामांनी केला  १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी १०६ वर्षांच्या व्हर्जिनीया मॅकलॉरिन यांच्यासोबत केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. व्हाईट हाऊसने हा व्हिडिओ अपलोड केलाय. 

अमेरिकेच्या पहिल्या 'कृष्णवर्णीय' राष्ट्राध्यक्षांना भेटून आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याचे या आजीबाईंचे म्हणणे आहे. 'ब्लॅक हिस्टरी' सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. 

१९०९ साली दक्षिण कॅरोलिना राज्यात त्यांचा जन्म झाला होता. २०१४ साली मॅकलॉरिन यांनी व्हाईट हाऊसला एक पत्र लिहून त्यांना ओबामांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी युट्यूबवर एक व्हिडिओही अपलोड केला होता. 

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये 'ब्लॅक हिस्टरी मंथ'च्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात अमेरिकेच्या इतिहासाच्या आठवणी जागवल्या जातात.

 

 

Dance Party with 106-year-old Virginia McLaurin

What's the secret to still dancing at 106? Watch 106-year-old Virginia McLaurin fulfill her dream of visiting the White House and meeting President Obama. #BlackHistoryMonth

Posted by The White House on 21 February 2016