३६ मुलांचा बाप आणि अपुरी इच्छा

 पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात पाक सेनेने मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. या नागरिकांना आपले घर सोडून जावे लागत असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घर सोडून जाणाऱ्या या हजारो लोकांमध्ये ५४ वर्षांच्या गुलजार खान यांचाही समावेश आहे. त्यांना घर सोडून जाण्याचे दुःख कमी आहे पण आपली एक इच्छा अपूर्ण राहिल्याचा खेद व्यक्त वाटतो आहे. ही इच्छा म्हणजे चौथा निकाह करण्याची...

AFP | Updated: Jul 17, 2014, 08:11 PM IST
३६ मुलांचा बाप आणि अपुरी इच्छा title=

इस्लामाबाद  :  पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात पाक सेनेने मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. या नागरिकांना आपले घर सोडून जावे लागत असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घर सोडून जाणाऱ्या या हजारो लोकांमध्ये ५४ वर्षांच्या गुलजार खान यांचाही समावेश आहे. त्यांना घर सोडून जाण्याचे दुःख कमी आहे पण आपली एक इच्छा अपूर्ण राहिल्याचा खेद व्यक्त वाटतो आहे. ही इच्छा म्हणजे चौथा निकाह करण्याची...

गुलजार यांना आपल्या तीन पत्नींपासून ३६ मुले आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार आतापर्यंत शावा मध्ये राहत होता. या ठिकाणी त्यांच्या हवेलीला ३५ खोल्या आहेत. त्यांच्या कुटुंबात १०० पेक्षा अधिक जास्त सदस्य आहेत. आता त्यांचा परिवाराला बानूमध्ये राहावे लागत आहे. 

आपल्या परिवाराला नव्या जागी शिफ्ट करण्यासाठी गुलजार यांचा पैसा खर्च होत आहे. जो पैसा त्यांनी आपल्या चौथ्या निकाहसाठी ठेवला होता. पण, गुलजार यांनी अजून हार मानली नाही. ते म्हणतात, चौथा निकाह करण्यासाठी सेनेची कारवाई संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

पत्नींनी हात वर केले
गुलजार यांना आपल्या प्रत्येक पत्नीकडून प्रत्येक १२ मुले आहेत. त्यांची कोणतीही पत्नी आता मुले जन्माला घालू शकण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांना आता चौथे लग्न करायचे आहेत, इस्लाममध्ये ४ लग्नांची परवानगी आहे. 
गुलजार यांचा पहिला निकाह १७ व्या वर्षी झाला होता. तेव्हा १४ वर्षांच्या एका नात्यातील महिलेशी हा निकाह झाला होता. पहिल्या पत्नीकडून गुलजार यांना ८ मुली आणि चार मुले आहे. त्यानंतर ८ वर्षांनंतर १७ वर्षांच्या तरुणीशी दुसरा निकाह झाला.  आपल्या भावाच्या विधवा पत्नीला आपलंस करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी तिसरे लग्न केले. 

१९७६ ते १९९२ मध्ये दुबईमध्ये टॅक्सी ड्रायव्हर म्हणून गुलजार यांनी काम केले होते. ते म्हणतात, मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. पर स्त्रीकडे वाकड्या नजरेने मी कधी पाहिले नाही. त्यामुळे माझ्या सर्व गरजा आपल्या पत्नीकडून पूर्ण करण्याचा मला अधिकार आहे. 

गुलजार यांचे स्वतःचे शेतं आहेत, तसेच त्यांचे दोन मुलं दुबईमध्ये टॅक्सी ड्रायव्हर आहेत. ते तेथून दर महिन्याला ५० हजार रुपये परिवाराच्या खर्चासाठी पाठवितात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.