www.24taas.com, कुवैत
अरब देशांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्सविरोधात चालू असलेल्या मोहिमेचा बळी कुवैत मधला एक मानवाधिकार कार्यकर्ता ठरला. लोकशाही नसलेल्या देशात सोशल मीडिया साइट ट्विटरवर त्याने केलेलं ट्विट त्याला थेट तुरुंगातच घेऊन गेलं.
ट्विटरवर या मानवाधिकार कार्यकर्त्याने हमीद अल खालिदी याने कुवैतचे शासक अमीर यांचा अपमान करणारं एक ट्विट लिहिलं. मात्र या ट्विटची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली. हमिद याला न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा मात्र त्याला देण्यात आली आहे.
कुवैत हे राष्ट्र इतर अरब राष्ट्रांच्या तुलनेत उदार मानलं जातं. मात्र तेथे सोशल मीडिया नेटवर्किंग साइट्सवर दबाव आणण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे क्रांती घडण्याची चिन्हं दिसू लागल्यामुळे अरब राष्ट्रांनी हा निर्णय घेतला आहे.