या व्यक्तीच्या १३ पत्नी एकाचवेळी प्रेग्नंट

कधी कधी असे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतायत की जे पुन्हा पुन्हा पाहिले तरी त्यावर विश्वास बसत नाही. 

Updated: Jul 8, 2016, 01:19 PM IST
या व्यक्तीच्या १३ पत्नी एकाचवेळी प्रेग्नंट title=

नवी दिल्ली : कधी कधी असे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतायत की जे पुन्हा पुन्हा पाहिले तरी त्यावर विश्वास बसत नाही. 

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. यात एक व्यक्ती १३ गरोदर महिलांसोबत दिसत आहे. याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. 

गरोदर महिलांचा फोटो शेअर करणाऱ्या या व्यक्तीने या सर्व महिला त्याच्या पत्नी असल्याचा दावा केलाय. इतकंच नव्हे तर सर्व महिला एकाच वेळी प्रेग्नंट आहेत. 

इंग्रजी वेबसाईट डेली मेलनुसार, या व्यक्तीच्या १३ पत्नीं एकाच वेळी गरोदर राहिल्याने नवा विक्रम प्रस्थापित झालाय. दरम्यान, ज्या व्यक्तीने हा फोटो शेअर केलाय त्या व्यक्तीचे नाव आणि ठिकाण देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा फोटो प्रँक असण्याची शक्यता आहे.