१२ जणांना ट्रकखाली चिरडण्यामागे आयसीस

या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 48 जण जखमी झालेत. आता या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या अतिरेकी संघटनेनी घेतलीय.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 21, 2016, 11:38 AM IST
१२ जणांना ट्रकखाली चिरडण्यामागे आयसीस title=

बर्लिन : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमस बाजारात ट्रक घुसवरून अनेकांना चिरडण्यात आलं होतं. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 48 जण जखमी झालेत. आता या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या अतिरेकी संघटनेनी घेतलीय.  

हा ट्रक जाणूनबूजून बाजारात घुसवण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र अपूऱ्या पुराव्यांअभावी त्याला सोडू देण्यात आलं.  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा हल्ला नेमका कुणी केला याचा शोध पोलीस घेतायत. गेल्यावर्षी फ्रान्सच्या निस शहरात अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.