www.24taas.com, लॉस एंजेलिस
ऑस्ट्रियाचा स्कायडायव्हर फेलिक्स बोमगार्टर यानं आज अंतराळातून उडी मारून ध्वनीच्या तीव्रतेनं उडी मारण्याचा नवा रेकॉर्ड कायम केलाय. पण, सगळ्यात लांब ‘फ्रीफॉल’ करण्याचं त्याचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलेलं नाही.
बोमगार्टर याची प्रवक्ता सारा एंडरसन यांनी ही माहिती दिलीय. ४३ वर्षीय फेलिक्स बोमगार्टर यानं वेगानं उडी मारण्याचा रेकॉर्ड कायम केलाय. त्यानं १,२८,०९७ फूटांच्या उंचीवरून ४ मिनिट १९ सेकंदांमध्ये १,१३७ किलोमीटर वेगानं उडी मारली.
५० वर्षांपूर्वी जोसेफ किटिंगर यांनी अंतराळातून वेगानं उडी मारण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. त्याला आव्हान देत बोमगार्टर यानं किटिंगर यांचा रेकॉर्ड तोडण्याचा चंग बांधला होता. किटिंगर यांनी १९६० साली अंतराळातून ३१,३३३ मीटर उंचीवरून उडी मारली होती. हेच किटिंगर बोमगार्टर याचा रेकॉर्ड होत असतानादेखील उपस्थित होते. इतकंच नव्हे तर किटिंगर यांनी बोमगार्टरच्या बॅकअप टीममध्ये सहभागी झाले होते.
एंडरसन यांच्या म्हणण्यानुसार, बोमगार्टर यानं मारलेली उडी नऊ मिनीट तीन सेकंदांपर्यंत सुरू होती. यामध्ये जमिनीवर उतरण्यासाठी आपलं पॅराशूट उघडल्यानंतरच्या चार मिनीट, ४४ सेकंदांचाही समावेश आहे. बोमगार्टर यांना पॅराशूट उघडण्यापूर्वी पाच मिनीटांपेक्षा जास्त वेळ फ्रीफॉल करायचा होता. आपलं तसंच त्यांना १,२०,००० पेक्षा कमी उंचीवरून उडी मारायची होती. पण ते मात्र त्यांना जमलं नाही. बोमगार्टर न्यू मॅक्सिकोच्या मरुस्थलमध्ये उतरले.