२६/११ सुनावणीच्या न्यायाधिशांची बदली

मुंबईमधील २६/११च्या आतंकवादी हमल्याशी संबधित पाकिस्तानात चालू असलेल्या लश्कर-ए-तोएबाचे कमांडर जकीउर रहमान लखवी आणि अन्य ६ पाकिस्तानी आरोपींच्या सुनावणीचे जज पाचव्यांदा बदलण्यात आले आहेत.

Updated: Jun 6, 2012, 11:55 AM IST

www.24taas.com, इस्लामाबाद 

 

मुंबईमधील २६/११च्या आतंकवादी हमल्याशी संबधित पाकिस्तानात चालू असलेल्या लश्कर-ए-तोएबाचे कमांडर जकीउर रहमान लखवी आणि अन्य ६ पाकिस्तानी आरोपींच्या सुनावणीचे जज पाचव्यांदा बदलण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या केसमधील आतंकवाद विरोधी कोर्टाचे जज शाहिद रफीक यांची बदली पंजाब प्रांतातील झांग प्रांतातील जिल्हा सत्र न्यायाधिश म्हणून करण्यात आली आहे.

 

या बदलीबरोबरच या प्रकरणातील सुनावणी ९ जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.  लखवी याचा वकील ख्वाजा हैरीस अहमद यांनी न्यायाधिशांच्या बदलीवर दुःख व्यक्त केलं. न्यायाधिशांच्या बदलीचं कुठलही कारण देण्यात न आल्याचं अहमद यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.