हॉलिवूड स्टार चिंपांझीचे निधन

हॉलिवूडमध्ये १९३० च्या दशकात टार्जन सिनेमात काम केलेल्या चिंपांझीचा वयाच्या ८० व्या वर्षी मृत्यू झाला. अमेरिकाच्या फ्लोरिडा राज्यातील सनकोस्ट प्राइमेट सेंच्युरीने दिलेल्या वृत्तानुसार चिंपाझींचा मृत्यू किडनी खराब होण्यामुळे झाला.

Updated: Jan 1, 2012, 07:36 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

 हॉलिवूडमध्ये १९३० च्या दशकात टार्झन सिनेमात काम केलेल्या चिंपांझीचा वयाच्या ८० व्या वर्षी मृत्यू झाला.  अमेरिकाच्या फ्लोरिडा राज्यातील सनकोस्ट प्राइमेट सेंच्युरीने दिलेल्या वृत्तानुसार चिंपाझींचा मृत्यू किडनी  खराब होण्यामुळे झाला.

 

सेंच्युरीने दावा केला आहे की चीता नावाच्या या चिंपाझींने १९३२ ते १९३४ दरम्यान  बनलेल्या टार्झन  सिनेमांमध्ये जॉनी वाइजम्युलर आणि मॉरीन ओ सलीवान सोबत काम केलं होतं. या चिंपांझीचे  वैशिष्ट्यं म्हणजे त्याला चित्रकलेची आणि फूटबॉलची आवड होती. तसंच ख्रिस्टियन संगीत ऐकण्याचीही आवड  होती. या चिंपाझींच्या दीर्घ आयुष्याचं कारण किंवा पुरावा उपलब्ध नाही.

 

टार्झन  सिनेमात काम केल्याचा दावी आणखी एका चिंपांझीने केला होता पण नंतर तो मागे घेण्यात आला. कदाचित टार्झन  सिनेमात एकापेक्षा अधिक चिंपांझीने काम केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.