हल्ल्यामागचे ते ४० भारतीय कोण?पाकचा सवाल

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरील हल्ल्यात 40 भारतीय नागरिकांचा सहभाग होता. आमची इच्छा आहे, की आधी भारताने याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.” असं एका पाकिस्तानातील विदेश मंत्र्याने म्हटलं आहे.

Updated: Jul 2, 2012, 11:49 AM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरील हल्ल्यात 40 भारतीय नागरिकांचा सहभाग होता. आमची इच्छा आहे, की आधी भारताने याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.” असं एका पाकिस्तानातील विदेश मंत्र्याने म्हटलं आहे.

 

4 जुलै रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत पाकिस्तान अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल याच्या अटकेविषयी भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चा होणार आहे. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. या बैठकीत अबू जिंदालचाच प्रश्न महत्वाचा असेल. अन्सारीच्या अटकेबद्दल पाकिस्तान भारताकडे स्पष्टीकरण मागणार आहे. “भारताने अद्याप अन्सारीच्या अटकेबद्दल आम्हाला कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.” असं एका पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं.

मुंबईवरील हल्ला भारतीयांच्या मदतीशिवाय होणं अशक्य आहे, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारतीय अधिकारी आम्हाला संपूर्ण माहिती देण्यास नेहमीच कचरतात, असंही पाकिस्तानचं म्हणणं आहे.

 

कागझी या आतंकवाद्याने बेगला अडीच लाख रुपये देऊन ओळख बदलून महाराष्ट्रात सिमीचं जाळं वाढवण्याच्या सूचना केल्याचं उघड झालंय. बेग त्यानंतर ठिकाणं बदलतं राहिला. बेगला पुण्यात सप्टेंबर २०१० मध्ये अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेनं अबू आणि फरार असलेल्या कागझी विरोधात एफआयआर दाखल केलाय. काझगीवर २६/११ च्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये दोन दिवस मॉकड्रील केल्याचं अबू हमजाच्या खुलाशात उघड झालंय. क्रुरकर्मा कागझीचं छायाचित्र पहिल्यांदा ‘झी 24 तास’नं प्रसिद्ध केलंय.