लष्कराच्या गोळीबारात सीरियात ४० ठार

दिवसागणित सीरियात हिंसाचारात वाढ होत आहे. संघर्ष टिपेला पोहोचला आहे. लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये, सीरियामध्ये आजपर्यंत किमान ४० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती मानवाधिकारांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेने आणि नागरिकांनी दिली आहे.

Updated: Jan 28, 2012, 03:07 PM IST

www.24taas.com, निकोशिया

दिवसागणित सीरियात हिंसाचारात वाढ होत आहे.  संघर्ष टिपेला पोहोचला आहे.  लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये,  सीरियामध्ये आजपर्यंत किमान ४० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे,  अशी माहिती मानवाधिकारांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेने आणि नागरिकांनी दिली आहे.

सीरियातील सुरक्षा पथकांनी देशाच्या विविध भागांत केलेल्या कारवाईत किमान ४० लोक ठार झाले आहेत. त्याशिवाय आंदोलकांशी झालेल्या संघर्षात सीरियाचे ८ सैनिक आणि सैन्यातून पळून गेलेल्या सात सैनिकांचाही समावेश आहे. ठार झालेल्या सैनिकांमध्ये एक कर्नलच्या दर्जाचा अधिकारी आहे.

देशातील संघर्ष होम्स या शहरात सर्वाधिक असून, सर्वाधिक मृत्यू याच शहरात झाले आहेत, असे सीरियातील मानवी हक्कांची वेधशाळा या ब्रिटनमधील  या संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.
होम्स जिल्ह्यातील कर्म अल् झीतून या गावात लष्कराने आंदोलकांचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी कारवाई सुरू केली. आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. मध्य सीरियातीलच हामा या शहरात गेल्या मंगळवारी लष्कराने जोरदार हल्ला चढविला होता. त्यात एका वृद्ध महिलेसह चार नागरिक ठार झाले होते.