भेटला रे... आदिमानव भेटला...

मानव हा हळूहळू विकसीत झालेला आहे. म्हणजे पूर्वी आदिमानव अस्तित्वात होता. त्यामुळे मानव जन्म हा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. तब्बल चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचा पूर्ण सांगाडा श्रीलंकेत पुरातत्त्व संशोधकांना मिळाला आहे.

Updated: Jun 21, 2012, 03:09 PM IST

www.24taas.com, कोलंबो

 

मानव हा हळूहळू विकसीत झालेला आहे. म्हणजे पूर्वी आदिमानव अस्तित्वात होता. त्यामुळे मानव जन्म हा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. तब्बल चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचा पूर्ण सांगाडा श्रीलंकेत पुरातत्त्व संशोधकांना मिळाला आहे. श्रीलंकेतील पश्‍चिम प्रांतातील फा हिएन गुहेत मिळालेला हा सांगाडा दक्षिण आशियातील सर्वांत पुरातन मानला जात आहे.

 

या सांगाड्याचे वय ठरविण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक महिना लागेल, असे संशोधकांनी सांगितले. गुहेत काही अणकुचीदार दगड आणि हाडांची हत्यारे मिळाली. या अवजारांचे वय सुमारे ३७ हजार वर्षे आहे.

 

"होमो सेपियन्स (आदिमानव) ४० हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेत स्थिरावले होते, या दाव्याला नव्या संशोधनामुळे पुष्टी मिळेल,' असे पुरातत्त्व संशोधक निमल परेरा यांनी सांगितले. श्रीलंकेत पूर्ण स्थितीतील इतका प्राचीन सांगाडा पहिल्यांदाच मिळाला आहे.