पाकमध्ये सात जणांची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा शहरात अज्ञात बंदूकधारी व्यक्तिंनी शिया समुदायाच्या पाच तर एका संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. क्वेटा शहरात वाढत्या कारवाईमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

Updated: Mar 29, 2012, 03:29 PM IST

www.24taas.com, क्वेटा 

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा शहरात अज्ञात बंदूकधारी व्यक्तिंनी शिया समुदायाच्या पाच तर एका संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. क्वेटा शहरात वाढत्या कारवाईमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस आणि  डॉक्टरांनी सांगितले की, बाईकवरून बंदूकधारी जात होते. त्यांनी एका व्हनवर गोळ्या झाडल्या. यातमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. मारण्यात आलेले सर्व लोक शिया समाजातील आहेत, अशी माहिती शिया समुदायाने सांगितले. मारलेले गेलेले लोक कामावर जात होते. डॉक्टरांनी सांगितले, मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींना दोन स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एकाची हालद गंभीर आहे. दरम्यान या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

पोलिसांनी सांगितले, अन्य घटनांमध्ये बंदूकधारी व्यक्तिंनी एका संस्थेच्या वाहनावर हल्ला केला. यामध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या हल्ल्याचा निषेध करत बारोरी मार्गावर काहींनी धरणे आंदोलन केले.