पाकचे राष्ट्रपती भारत भेटीवर

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी रविवारी भारतभेटीवर येणार आहेत. ते पंतप्रधान मनमोह सिंग यांचीही भेट घेणार आहेत.या भेटीत मुंबई हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी हाफीज याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता कमी आहे.

Updated: Apr 7, 2012, 10:49 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी रविवारी भारतभेटीवर येणार आहेत. ते  पंतप्रधान मनमोह सिंग यांचीही भेट घेणार आहेत.

 

 

या भेटीत मुंबई हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी हाफीज याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता कमी आहे. या भेटीवेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित  राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. झरदारींच्या भारतभेटीवेळी त्यांचा मुलगा बिलावल भुट्टोही उपस्थित राहणार आहे. बिलावल भुट्टो सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची जबाबदारी सांभाळत आहेत.

 

 

बिलावल वडिलांबरोबर पहिल्यांदाच भारतात येत आहेत. झरदारी आणि बिलावल हे दोघे अजमेरच्या दर्गा शरीफला जाणारेत. 70 च्या शतकात बेनजीर भुट्टो यांनी वडिलांसह शिमला येथे आल्या होत्या. बेनजीर भुट्टों पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अनेकवेळा भारताला भेट दिली आहे.