ढासळती अर्थव्यवस्था: पंतप्रधानांना चिंता

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केलीय. विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश असलेल्या जी-२० समुहाच्या सातव्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते.

Updated: Jun 19, 2012, 10:35 AM IST

www.24taas.com, लॉस काबोस, मॅक्सिको

 

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केलीय. विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश असलेल्या जी-२० समुहाच्या सातव्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते.

 

आर्थिक विकासाचा दर पुन्हा वर आणणं आणि देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणं, हे सरकारसाठी एक आव्हान असेल असं सांगतानाच आर्थिक विकासाचा दर वर्षाला ८ ते ९ टक्यांवर आणणं शक्य असल्याची एक आशाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलीय. यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

जागतिक नेत्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, इतर देशांप्रमाणेच आम्हीही २००८ नंतर आर्थिक प्रोत्साहनासाठी देशाच्या राजकोषाला होणा-या तोट्याकडे दुर्लक्ष केलं. आता आम्ही याला दुस-या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठीच सबसिडीजवर ताबा मिळवण्यासहीत आणखीही काही कठोर निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. विकसनशील भारताच्या प्रगतिच्या आड काही अंतर्गत बाबी आड येत असल्याचं कबूल करत पंतप्रधानांनी त्या दूर करण्याचा विश्वास व्यक्त केलाय. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाय मजबूत आहे त्यामुळेच लवकरच वर्षाचा आर्थिक विकासाचा दर पुन्हा एकदा ८ ते ९ टक्क्यांवर स्थिरावेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी नकारात्मक जागतिक प्रभावामुळे भारतामध्ये होणा-या गुंतवणुकीबद्दलही यावेळी त्यांनी चर्चा केली.

 

.