www.24taas.com, नवी दिल्ली
यंदाच्या आर्थिक वर्षाअखेर जगभरातल्या पहिल्या दहा आर्थिक बाजारपेठांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागण्याची शक्यता डेटामॉनिटरच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
सध्या युरोपियन देशांवरील आर्थिक संकटं पाहता भविष्यात त्यांच्या बाजारपेठांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांना पुढे येण्याची चांगली संधी असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आलाय.
डेटामॉनिटरच्या 2012 ग्लोबल वेल्थ मार्केट या अहवालात हे अनुमान काढण्यात आलंय. ही यादी 2011 च्या अखेरीस बाजारपेठांकडे असणा-या डॉलरच्या साठ्यावरून तयार करण्यात आलीय.
भारत, ब्राझील सारख्या अर्थव्यवस्थांमध्ये 2015 पर्यंत रोकडसुलभता साडेचार लाख कोटी डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार 2015मधील टॉप टेन अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, चीन जपान, ब्रिटन, जर्मनी, भारत, ब्राझील, इटली, कॅनडा आणि फ्रान्सचा समावेश आहे.