www.24taas.com, वॉशिंग्टन
भारतात कायद्यामध्ये पळवाट असल्याने भ्रष्टाचार आणि कितीही मोठा गुन्हा केलेला अधिकारी आणि राजकारनी लोक सहीसलामत सुटतात आणि अन्य कारभार करण्यास पुन्हा राजी होतात. मात्र, अमेरिकेत कायद्याचा धाक असल्याने गव्हर्नरसारख्या व्यक्तीला तुरूंगाची हवा खायला लागली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोडलेल्या सिनेटच्या जागेचा लिलाव करण्याचा प्रयत्न गव्हर्नरसाहेबांनी केला. त्याची परिणीती त्यांना भोगावी लागली आणि त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. जेलमध्ये जाणारे हे गव्हर्नर हे वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. त्यांना यापूर्वी पदावरून हटविण्यात आलेले आहे.
पदावरून हटविण्यात आलेले इलिनोइसचे माजी गव्हर्नर रॉड ब्लागोजेविच यांना गुरुवारी तुरुंगात पाठविण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोडलेल्या सिनेटच्या जागेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या अन्य अनेक आरोपांप्रकरणी त्यांना १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या गव्हर्नरना नोव्हेंबर २००८ मध्ये ओबामा यांच्या ऐतिहासिक विजयाच्या काही आठवड्यांनंतर अटक करण्यात आले होते.