अमेरिकेचा पाकिस्तानात हल्ला

दहशतवादी कारवायांत वाढ होत असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडविण्यासाठी पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. अमेरिकन हल्ल्यात नऊ दहशतवादी ठार सांगण्यात येत आहे.

Updated: May 5, 2012, 03:54 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद 

दहशतवादी कारवायांत वाढ होत असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडविण्यासाठी पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले.  अमेरिकन हल्ल्यात नऊ दहशतवादी ठार सांगण्यात  येत आहे.

अफगाणिस्तानात गेल्या महिन्यात आणि काही दिवसांपूर्वी तालिबानी दहशतवाद्यांनी  हल्ला केला होता. हा हल्ला अमेरिकेविरोधी असल्याचे दहशतवाद्यांनी म्हटले होत. सरकारी अधिकारी मुहम्मद अमीन यांनी  सांगितले की,  उत्तर वझिरीस्तानमधील शावल पर्वतांमध्ये हा हल्ला करण्यात आला.

अमेरिकेच्या हल्ल्यात तालिबानचे नऊ दहशतवादी ठार झाले आहेत. ड्रोन विमानांनी दोन क्षेपणास्त्रे दहशतवाद्यांच्या तळावर सोडली. उत्तर वझिरीस्तावमधील सात आदिवासी भागांत दहशतवाद्यांचे तळ असल्याने याठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात येतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाटो सैनिकांनी पाकिस्तानच्या २४ जवानांना ठार मारल्यानंतर केलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे.