अमेरिका अंधारात चाचपडतेय

जगावर राज्य करणारा देश असा तोरा मिरवणाऱ्या अमेरिकेला तुफान संकटामुळे अडचणीत यावे लागले. चक्क आपला स्वातंत्र्यदिन अंधारात साजरा करावा लागला तर काही ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.

Updated: Jul 5, 2012, 04:09 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

जगावर राज्य करणारा देश असा तोरा मिरवणाऱ्या अमेरिकेला तुफान संकटामुळे अडचणीत यावे लागले. चक्क आपला स्वातंत्र्यदिन अंधारात साजरा करावा लागला तर काही ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.

जबरदस्त वादळाचा तडाखा बसल्याने दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी ४० लाख लोक अंधारात होते. सोमवारी अनेक ठिकाणी १८ लाख घरांमध्ये वीजपुरवठा सुरु झाला होता. तोपर्यंत अमेरिका अंधारात चाचपडत होती. वादळानंतर लगेच प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. त्यामुळे अंधाराच्या भीती कायम आहे.

वादळाने जगातील शक्तिशाली असलेल्या अमेरिकेला दे धक्का दिला. अमेरिकेत वेगाने वाहणार्‍या तुफान वार्‍यामुळे राजधानी वॉशिंग्टन आणि इंडियाना ते डेलेवरमधील १० प्रांतातील १२ लाख लोकांचा वीजपुरवठा खंडित आहे. निसर्गाच्या या रुद्रावतारामुळे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर पाणी पडले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे  काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, वादळाने चांगलाच अमेरिकेला धका शिकवला.