अफगाणिस्तान संसदेवर रॉकेटहल्ला...

अफगाणिस्तान साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. काबुलमध्ये १२ बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे. ब्रिटीश दूतावासाच्या जवळ स्फोट झाले आहेत.

Updated: Apr 15, 2012, 05:29 PM IST

www.24taas.com, काबूल

 

अफगाणिस्तान साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. काबुलमध्ये १२ बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे. ब्रिटीश दूतावासाच्या जवळ स्फोट झाले आहेत. काबुलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे.

 

अफगाण संसदेतही हल्लेखोर घुसल्यानं खळबळ माजली आहे. नाटोच्या कार्यालया जवळही गोळीबार झाला आहे. जर्मन दूतावासावरही हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. काबुलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात गोळीबार झाला आहे. जर्मन दूतावासावर हल्ला केल्यानं आग लागली आहे. तालिबानने स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

हल्लेखोरांनी अफगाणिस्तानच्या संसदेत घुसखोरी केली. या भीषण हल्ल्याची तालिबानने जबाबदारी स्वीकारली. काबूलमधील भारतीय दूतावास मात्र सुरक्षित आहे. काही वेळापुर्वीच जलालाबाद एअरपोर्टवरही अतिरेक्यांनी हल्ला चढवला आहे.