नवी दिल्ली : 'आप'च्या विजयाला दिल्लीकरांना दिलेली १० आश्वासनं कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आता आपसमोर लक्ष्य आहे ते पाच वर्षांमध्ये ही आश्वासनं पुर्ण करण्याचं. एक नजर टाकूया आपच्या आश्वासनांवर आणि त्यानिमित्तानं निर्माण झालेल्या काही प्रश्नांवर...
आश्वासन - दिल्लीकरांना स्वस्त वीज
प्रश्न - वीज निर्माण कशी करणार ?
आश्वासन - दिल्लीत स्वच्छ आणि स्वस्त पाणी कायदेशीर अधिकार
प्रश्न - स्वस्त पाणी देणे कसे शक्य आहे ?
आश्वासन - दिल्लीत जिथे झोपडी तिथे घर
प्रश्न - घर बांधणीसाठी पैसे कसे उभे करणार ?
आश्वासन - दिल्लीत सुरक्षेसाठी 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे
प्रश्न - दिवसाला 1825 सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसवणार ?
- पूर्ण राज्याचा दर्जा नसतांना पैसे उभे करणार तरी कसे ?
आश्वासन - दिल्लीत खाजगी शाळांच्या फीवर नियंत्रण
प्रश्न - खाजगी शाळांवर नियंत्रण कसे मिळवणार ?
आश्वासन - दिल्लीत दोन लाख जन शौचालय
प्रश्न - दर दिवशी 109 जन शौचालये कशी उभारणार ?
आश्वासन - दिल्लीत 20 नवीन कॉलेज
प्रश्न - दरवर्षी चार नवी कॉलेज कशी उघडणार ?
आश्वासन - दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये 30 लाखाहून अधिक बेड
प्रश्न - दरदिवशी 1,643 बेडचे लक्ष्य कसे पुर्ण करणार ?
आश्वासन - दिल्लीतील युवकांना 8 लाख नवीन नोकऱ्या
प्रश्न - नव्या नोकऱ्या निर्माण कशा करणार?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.