मोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल

कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली 

Updated: Apr 24, 2017, 12:22 PM IST
मोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल title=

अहमदाबाद : कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे. क्रिकेटच्या सट्ट्यामध्ये पैसा हारल्यानंतर पैसे नसल्याने त्याला पैशांसाठी धमक्या येत आहेत. जेव्हा या युवकाचा व्हि़डिओ व्हायरल झाला तेव्हा राजकोट पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

दीपक धनानी म्हणतो की, कर्ज न फेडता आल्याने सट्टेबाजांकडून आणि काही गुन्हेगारांकडून मला जीवे मारण्याची धमकी येत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनानी गायब आहे. धनानीने व्हिडिओमध्ये म्हटलं की, 'नमस्कार नरेंद्र मोदी साहेब, नमस्कार राजकोट पोलीस कमिश्नर साहेब। माझं नाव दीपक जमनादास धनानी आहे. राजकोट आणि इतर शहरांमधील सट्टेबाज मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मी खूप चिंतेत आहे.'

पाहा व्हिडिओ