गोवा: गोव्याची राजधानी पणजी इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात तिखट टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिलेनं आरोप लावलाय की तिच्या शेजाऱ्यानं तिच्यावर दोन दिवस अत्याचार केला होता.
33 वर्षीय पीडित महिलेचा आरोप आहे की, पहिल्यांदा 22 जूनला जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला तेव्हा तिनं मापुसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी ही केस नॉन कॉग्निजेबल असल्याचं म्हणत योग्य ती कारवाई केली नाही. 26 जूनला पुन्हा एकदा पीडितेसोबत छेडछाडी झाली. तेव्हा कुठं पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवली.
आपल्या कामातील निष्काळजीपणा आणि एफआरआय दाखल करण्यात केलेला उशीर यामुळं पोलीस स्टेशनच्या एएसआयला निलंबित करण्यात आलंय. पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासादरम्यान तिच्या शरीरातील खाजगी अवयवांवर अनेक जखमांचे व्रण आढळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.