धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयामुळं महिलेची नग्न धिंड

देशात वारंवार महिलांवरील अत्याचारात वाढ होतांना दिसतेय. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयामुळं एका आदिवासी महिलेला नग्न करुन तिची धिंड काढण्यात आली.

Updated: Dec 2, 2014, 11:24 AM IST
धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयामुळं महिलेची नग्न धिंड title=

भोपाळ: देशात वारंवार महिलांवरील अत्याचारात वाढ होतांना दिसतेय. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयामुळं एका आदिवासी महिलेला नग्न करुन तिची धिंड काढण्यात आली.

४५ वर्षांची ही महिला जादूटोणा करत असल्याचा संशय बैतूल जिल्ह्यातील रायसेडा गावातील नागरिकांना होता.
याच संशयामुळं गावातील सहा ग्रामस्थांनी महिलेला अनेक तास नाल्याच्या पाण्यात उभं केलं. त्यानंतर तिला मारहाण केली. तिचे कपडे काढून तिच्या गळ्यात चप्पलांची माळ घातली आणि तिची गावात धिंड काढली. कळस म्हणजे हा लाजिरवाणा प्रकार दोन दिवस सुरु होता.
 
या संपूर्ण प्रकारानंतर महिलेनं पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आलीय.   
 
पीडित महिला आपल्या मुलीसह गावात राहते. "मला जादूटोणा येत नाही. पण ग्रामस्थ माझ्यावर संशय घेतात आणि त्रास देतात," असा आरोप महिलेनं केला आहे. या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.