आरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?

रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे. 

Updated: Dec 2, 2014, 10:35 AM IST
आरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार? title=

मुंबई: रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे. 

व्याजदर कमी करायला ही स्थिती पोषक असली, तरी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेल्या संकेतांनुसार आजच्या पतधोरणात व्याजदर जैसे थे राहतील अशी शक्यता आहे. व्याजदर घटवल्यास त्यामुळं महागाई पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं आर्थिक स्थिती अधिक खंबीर होईपर्यंत राजन थांबतील, असं भाकीत वर्तवलं जातंय. 

महत्त्वाचं म्हणजे गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राजन यांची भेट घेऊन व्याजदर घटवण्याची विनंती केली होती. उद्योग जगताकडूनही ही मागणी होतेय. मात्र राजन यांची कार्यशैली बघता या विनंत्यांकडे पाठ फिरवली जाण्याचीच शक्यता अधिक आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.