नवी दिल्ली: 23 वर्षीय तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणावर बलात्कार तसंच चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देण्याच्या आरोपातून तरुणाची मुक्तता झालीय. तरुणीनं कोर्टात आपली चूक स्वीकारली की, तिनं भांडण झालं म्हणून रागाच्या भरात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती.
आणखी वाचा - पाहा कशापद्धतीनं महिलेनं दुकानदाराला लावला चुना, सीसीटीव्हीत चोरी कैद
अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजीव जैन यांनी फरीदाबाद इथं राहणाऱ्या तरुणाला फ्रीलांस अँकरिंग करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलंय. कोर्टानं म्हटलं,'यात मुख्य साक्षीदार स्वत: याचिकाकर्तीच आहेय... तिनं कोणत्याही प्रकारे सरकारी पक्षाचं समर्थन केलं नाही आणि आपली साक्ष वारंवार बदलली.'
आणखी वाचा - मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड
फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले, 'आरोपीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या साक्षीवरून आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध होत नाही. तरुणीनं सांगितलं ते लिव्ह इनमध्ये राहत होते आणि तिच्या संमतीवरूनच त्यांच्यात संबंध होते. मात्र नंतर भांडण झाल्यानं रागाच्या भरात तिनं ही तक्रार केली होती.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.