वाराणसीत रशियन तरुणीवर अॅसिड हल्ला

वाराणसीतील लंका परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय रशियन तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालेय. तिला तात्काळ बीएचयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Nov 13, 2015, 04:00 PM IST
वाराणसीत रशियन तरुणीवर अॅसिड हल्ला title=

नवी दिल्ली : वाराणसीतील लंका परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय रशियन तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालेय. तिला तात्काळ बीएचयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लंका परिसरात ही तरुणी भाड्याच्या घरात राहत होती. शुक्रवारी सकाळी झोपेतत तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. घर मालकाने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्या उजव्या बाजूचे शरीर जळालेय. दरम्यान, डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीला कोणाताही धोका नसल्याचे म्हटलेय. दरम्यान, अॅसिड हल्ला घरमालकाच्या मुलाने केल्याचा आरोप या तरुणीने केलाय.
 
दारिया प्रोकिना ही २७ वर्षीय तरुणी रशियातून ४ महिन्यांपूर्वी वाराणसीत आली. वाराणसीत आल्यानंतर तीने लंका परिसरात छितूपूर परिसरात भाड्याने घर घेतले. याचवेळी तिची ओळख घरमालकाचा मुलागा सिद्धार्थ श्रीवास्तव याच्याशी चांगली मैत्री झाली. दोघंही अनेकवेळा बाहेर फिरायला जायचे. दोन दिवसांपूर्वी दारिया दार्जिलिंगवरून आली होती. रात्री उशिरा ती टेरेसवर झोपली होती. सकाळी तिच्या अंगावर अॅसिड फेकण्यात आले.

सिद्धार्थ याचे काका पंकज श्रीवास्तव यांनी सांगितले, पहाटे पाच वाजताना ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी मी धाव घेतली. त्यावेळी प्रोकिना भाजली होती. तिला तात्काळ बीएचयू रुग्णालयात दाखल केले. ती केमिकलने भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घरमालकाच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केलेय.

पोलिसांनी सांगितले, सिद्धार्थ आणि प्रोकिना यांच्यात घनिष्ठ संबंध होते. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, प्रोकिना पुन्हा रशियात जाण्याच्या तयारीत होती. त्यामुळे दोघांच्यात भांडन होत होते. याच रागातून त्याने हा हल्ला केला असल्याचे पोलिसांनी म्हटलेय.

दोन-तीन दिवसांपूर्वी सिद्धार्थने सल्फ्यूरिक अॅसिड खरेदी केले होते. सिद्धार्थाची मानसिकता ठिक नव्हती. त्याचावर संशयाची सूई आहे. या घटनेनंतर सिद्धार्थ फरार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.