नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय.
हिवाळी अधिवेशनातच जीएसटी संदर्भातील तीन विधेयकं, सरोगसी विधेयक, एनर्जी सुधारणा विधेयक, मोटार वाहन सुधारणा विधेयक यासह एकूण २२ विधेयकं मांडण्यात येणार आहेत.
चार आठवड्यांच्या या अधिवेशनात नोटाबंदीवरूनच गदारोळ होण्याची चिन्हं दिसतायत. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीमुळं राम मंदिराचाही जयघोष होण्याची शक्यता आहे. परिणामी दिल्लीच्या थंड वातावरणात राजकारण चांगलंच तापणार आहे.